About Us

लिबरल म्हणजे काय

लिबरल म्हणजे स्वतंत्रतावादी, खुली मुक्तवादी. हे स्वातंत्र्य म्हणजे व्यक्ती-व्यक्ती स्वत:चे आनंद, सुख-दु:ख निवडणे, त्याप्रमाणे आचरण करायला मोकळीक असणे; अर्थात इतरांच्या तशा हक्कांवर मर्यादा न आणता हे स्वातंत्र्य उपभोगण्याचे आहे. स्वातंत्र्य आणि उत्तरदायित्व ही दोन चाके आहेत, त्यावरच हे तत्वज्ञान आधारित आहे. शास्त्रीयता हेही याचे एक प्राण तत्व आहे.

किमान व प्रभावी राज्ययंत्रणा यासाठी आवश्यक आहे. संरक्षण, कायदा-सुव्यवस्था, न्यायव्यवस्‌था यासाठी चांगली व कार्यक्षम असायला हवी, तरच हे स्वातंत्र्य शक्य आहे. राष्ट्रकल्पना हा एक प्रकारे संकुचितवाद असला तरी राज्यव्यवस्थेसाठी राष्ट्र कल्पना अपरिहार्य आहे.

व्यक्तीच्या खाजगी हक्क अधिकारात ढवळाढवळ न करता राज्य व सरकार काम करणे अपेक्षित आहे.

भारतीय घटना मूलभूत स्वातंत्र्याचा हक्क म्हणून उल्लेख करते, मात्र शेड्यूल 9 ची निर्मिती झाल्यावर हे हक्क मर्यादित व संकुचित झाले आहेत. पण भाषण स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, कायद्यासमोर समानता, जीवनाचा हक्क, संचार स्वातंत्र्य, सार्थ शोध हे सर्व मूलभूत हक्क आहेत. यातूनच व्यक्तिगत सामाजिक आणि राष्ट्रीय प्रगती होऊ शकते.

लोकशाही म्हणजे प्रत्येकाला सरकार निवडण्याचा हक्क असणे, यासाठी मुक्त मतदानाची पद्धत, बहुपक्षीय पर्याय असणे हा केवळ एक भाग झाला, पण स्वत:च्या उन्नतीसाठी पूर्ण अनिश्चित स्वातंत्र्य, मुक्त बाजारपेठ व्यवस्था या खुल्या लोकशाहीचेच अंग आहेत. खऱ्या लोकशाहीला ही दोन्ही स्वातंत्र्ये मूलभूत आहेत. समाजवाद, साम्यवाद तसे धर्म-जातीभेद या लोकशाहीला बाधक आहेत, त्यामुळे लिबरल विचारसरणी निशेध करते.

खरी लिबरल खुली लोकशाही समाजव्यवस्था अशी किंवा तशी असावी (उदा. समाजवादी) असा आग्रह धरू शकत नाही, सर्व पर्याय खुले आहेत अशी भूमिका आहे. समाज नित्यनूतन वयवस्था विकसित करीत राहील सरकारने त्यात मधे पडायचे कारण नाही असे लिबरल प्रवाह मानतो.

आताच्या लिबरल प्रवाहाची खरी सुरुवात 200 वर्षांपूर्वी हॉब्स वगैरे ब्रिटीश परंपरेतून झाली तरी भारतातली चर्वाक परंपरा हीच आहे. निजीश्र्वरवादाबरोबरच चर्वाक प्रवाह लिबरल तत्वप्रणाली सांगते.

भारताची राज्यघटना मूलत: एक लिबरल रचना आहे. त्यात 1957 पासूनच घातक बदल होत गेले. हा स्वतंत्र विवेचनाचा विषय आहे. आज आपल्याला व्यक्ति स्वातंत्र्य वरवर दिसत असले तरी मालमत्ता विषयक हक्क बाधित झाले आहेत. मालमत्ता हक्क नसताना आर्थिक स्वातंत्र्य व प्रगतीची कल्पना अशक्य आहे.

लिबरॅलिझममधे अभिजात (जुना) व नवा असे दोन मुख्य प्रवाह आहेत. अभिजात प्रवाह राज्यव्यवस्थेपासून व्यक्तीसाठी पूर्ण स्वातंत्र्य मागतो, मुक्त बाजारपेठेचे समर्थन करतो. नवा प्रवाह राज्यव्यवस्थेचा उपयोग व्यक्ती व्यक्तीला सक्षम (आरोग्य शिक्षण आदि) करण्यासाठी असावा, पण बाजारपेठ फक्त मालमत्ता हक्क मूलभूत मानतो.

राष्ट्रांच्या सीमा, परचक्रापासून संरक्षण अंतर्गत कायदा-सुव्यवस्था ही विसाव्या शतकापासूनच शक्य झाली, इथूनच पुढे व्यक्तिगत स्वातंत्र्य शक्य होते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र राज्य सरकार व्यवस्था मर्यादित हवी अन्यथा ती माणसाला जखडून शोषण करते.

व्यक्ती स्वातंत्र्यापासूनच कला, विज्ञान, अर्थ समृद्धी शक्य आहे, शृंखलाबद्ध माणूस ही ---सहसा साध्य करू शकत नाही.

भारतात, महाराष्ट्रात असलेली क्षीण लिबरल परंपरा वाढवणे, मुख्य प्रवाह करणे हे प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. यासाठीच आम्ही प्रयत्नशील आहोत.

लिबरल गटाबद्दल

महाराष्ट्रातल्या मुक्तवादी व्यक्तींसाठी ही वेबसाईट एक साधन स्त्रोत आहे. या सगळ्यांची सर्व मते सारखीच असतील असे नाही, तेवढा खुलेपणा व सहनशक्ती, नम्रता अपेक्षितच आहे. योग्य भाषेत एकमेकांचा आदर राखून तीव्र मतभेदही मांडता येणे ही एक पूर्व अट आहे. हिंसा व शीवीगाळ ही लिबरल तत्वज्ञानाला बाधक आहे. बहुशास्त्रीय पद्धतीत विचार करता येणे, तो योग्य भाषेत मांडणे, समजावून घेणे, स्वत:चे मत आवश्यक तर बदलता येणे यासाठी योग्य संवाद पद्धती ठेवणे ही तर पूर्वअट आहे. व्यक्तिव्यक्तित धर्म-जात-लिंग-राष्ट्रीयत्व अशी भेदाभेद न मानता विचार-संवाद करता येणे आम्ही आवश्यक मानतो.

या गटासाठी एक फेसबुक साईट (महाराष्ट्र लिबरल या नावाने) आम्ही बनवली आहे. तसेच ही वेबसाईट "संग्रह' या स्वरूपाची आहे व विकसित व्हावी अशी अपेक्षा आहे. यापलीकडे जाऊन लिबरल तत्वप्रणाली व साधनांचा अभ्यास व प्रसार करणे सोपे व्हावे हाच या प्रयत्नांचा पूरक हेतू आहे.

 

प्रत्येक व्यक्तीला, कुटुंबाला समाजाला आर्थिक प्रगतीची आस असते. कष्ट, धडपड, शोध, जोखीम धोका पत्करून अधिकाधिक क्रयशक्ती व साधने जमवण्याचा उद्योग माणसाची प्राचीन व मूलभूत प्रेरणा आहे. (त्याग, संन्यास, अदि कल्पना परिघावरच्या व दुय्यम आहेत) या उद्योगातूनच हजारो वर्षे मानवी संस्कृती, समाज विकसत गेले. युद्धे व व्यापार या उद्यमाची भिन्न रूपे आहेत. बहुतांश प्रश्न मूलत: आर्थिक असतात. प्रश्र्नांचे आर्थिक स्वरूप नाकारत गेलो तर मूळ समस्यांचे निराकरण होत नाही.

अर्थात अधिक प्रेरणेच्या (अर्थस्य पुरुषो दास:) मुळाशी कोणत्या जैविक प्रेरश आहेत याचा शोध अनेकांनी घेतला आहे. "मान्यता' मिळणे ही व्यक्तीची मूलभूत मानसिक गरज आहे, त्यातूनच आर्थिक प्रेरणा उद्‌भवते असे अनेक विचारवंत मानतात. या मान्यतेच्या इच्छेपोटी सर्व अर्थ व्यवहार (संघर्ष देखील) फुलतात असे मानणे संयुक्ति आहे.

आर्थिक प्रगतीसाठी आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. मालमत्ता धारणेचा हक्क, बाजारात हवी ती वस्तू हवी तशी विकण्या-घेण्याचा हक्क हा पायाभूत आहे. फक्त बाजारवाद म्हणजे भांडवलशाही नव्हे; तो सरकारशाही साम्राज्यावर व भांडवलशाहीचा मक्तेदारीला खुला पर्याय आहे. इतरांना इजा न करता, न्याय्य हक्क न डावलता व्यापार-उद्योग करता येणे महत्त्वपूर्ण आहे. हे होण्यासाठी सरकार व न्यायव्यवस्‌ता नियंत्रक/अंपायर म्हणून काम करू शकते, ते आवश्यक आहे. पण सरकारने स्वत:कडे व्यापार उदीमाची मक्तेदारी घेणे,  स्पर्धात्मकतेला अडथळे आणणे हे गैर आहे असे आम्ही मानतो.

खाजगी मालमत्ता हे आर्थिक प्रगतीचे कारण व परिणाम आहे, कुटुंबव्यवस्था व खाजगी मालमत्ता हक्क, लोकशाहीसाठी पायाभूत आहेत. कम्युनिस्ट व समाजवादी देशात मालमत्ता व कुटुंबे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे त्या देशांचा संपूर्ण डोलारा कोसळला हा इतिहास ताजा आहे.

भारतात आजमितीला अनेक आर्थिक निर्बंध आहेत, त्यामुळे देशाची प्रगती खुंटलेली आहे. ब्रिटीशांनी शेतीचे व जंगलांचे शोषण केले, उद्योगधंदे मागास ठेवले. स्वातंत्र्यानंतर नियोजन व समाजवादी आर्थिक निर्बंध जारी झाले. लायसन्स परमिट राज, उत्पादनवाढीला शिक्षा-बंधने, आयात-निर्यात बंधने, शेतीमालाचा भाव पाडून अन्नधान्य स्वस्त करणे, शेतजमीन व शेतीमाल व्यवहारावर विविध जाचक निर्बंध या सगळ्यातून देश अविकसित राहिला. 1992 साली जागतिकीकरणाची पहाट उगवल्यावरच नाईलाजाने का होईना खुलीकरणाची प्रक्रिया सुरू झाली, पण तत्कालीन पंतप्रथान व अर्थमंत्र्यांनी ग्रामीण व शेतीविषयक खुलीकरण आणण्याचे टाळले. दुर्दैवाने आजही यातील बरीच बंधे शेती, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर जारी आहेत.

लिबरल गट असे मानतो की जमीन-शेतीविषयक खुलीकरणातील निर्बंध लावून देश संकट ओढवून घेत आहे. विविध बंधने हटवून

  1. शेतीतून ज्यांना बाहेर पडायचे आहे त्यांना बाहेर पडू देणे व नवा उद्योग व्यवसाय सुरू करणे, त्यासाठी शेती विकत देऊन भांडवल उभारणे.
  2. शेतजमिनींचे तुकडीकरण थांबवून, उलटे फिरवून व्यावसायिक तत्वावर शेती केली तर यशस्वी होईल व त्यावर अवलंबित कुटुंबेही तगू शकतील.
  3. शेती व ग्रामीण संरचना (पाणी-वीज-रस्ते) सुधारण्यासाठी शासनाने अधिक गुंतवणूक करण्याची निकड आहे.
  4. शेतीविषयक व ग्रामीण रोजगारासाठी तंत्रज्ञान कौशल्ये, बाजारपषं विकसन यासाठी स्पर्धात्मक व्यवस्था वापरावी, तशी निर्माण होऊ द्यावी.

विविध सबसिड्यांनी बाजार व्यवस्थेचे विकृतीकरण होत आहे व अर्थव्यवस्थेवर त्याचा दुष्परिणाम झाला आहे. याऐवजी सबसिडी क्रमश: कमी करत ज्यांना गरज अहे त्यांना डायरेक्ट कॅशबॅक ट्रान्सफर मार्गाने मदत करावी, त्यामुळे गळती थांबेल व सरळ मदत होईल  व बाजार व्यवस्था टिकून राहील.

About the Liberal Group

This group stands for liberal values, policies, discourse and programs. Obviously this is one of the many groups in India and world, but ours is mostly evolved from the farmers’ movement in Bharat since 1979 under late Shri Sharad Joshi.


Liberalism

Liberalism stands for liberal democracy with universal adult franchise and multiparty elections, openness of economy and freedom for enterprise, individual freedom and choices, minimum but functioning state, rule of law, rational scientific attitude, fundamental human rights including right to private property, secularism and tolerance of dissent.

We believe that the fall of socialism with the Berlin wall collapse in 1989 was imminent and inevitable. Socialism brings repression by state, kleptocracy, license permit quota Raj, stifles individual freedom; blocks progress and hands power to a group and will be a disaster all the way.

The tradition of liberalism, although India had its Charvak tradition, really started in the west with John Lock, Hobbs and Adam Smith. French revolution and American liberation and the civil wars are important political events for liberal history. The US president Thomas Jefferson defined liberalism in practice. In the last century Fredrik Hayek and Milton Friedman were the stalwarts of classical liberalism that spoke for free markets. व्यक्तीस्वातंत्र्य

We have many modern spokespersons of liberalism-or rather modern version of liberalism- like Jagadsih Bhagawati and Francis Fukuyama, the latter is famous for his liberal democracy doctrine.

In India BR Ambedkar was the most cogent speaker of liberalism, and Gandhi did it in some way for individual liberty (however he was not very strong on scientific rationale, economy or). Late shri C Rajagopalachari, Minoo Masani and many others held the flag in post-independence years. However in the late seventies and after, Sharad Joshi was the leading and perhaps the sole light of liberal politics in India, more than Narsimha Rao and Manmohansingh. The Indian Liberal Group and the Freedom First magazine led by shri S V Raju was another attempt to keep the embers alive. Today we see newspapers full of liberal writers and advocates. Arvind Panagariya, Dy Chairman of NITI is another well-known liberal-democrat of our times.

The original Constitution drafted under Dr B R Ambedkar was a liberal constitution, tarnished and highjacked later by socialist changes under Nehru-Indira Gandhi and Janata party. Today, we cannot even register a political party without swearing by socialism. There is a long journey ahead indeed.

Late shri Sharad Joshi espoused liberal policy for problems of India and the farm-crisis in particular. The broad framework of his position comes in the manifesto of the Swatantra Bharat party he founded. He was the first in eighties to espouse liberal solutions, even before the 1992 Rao-Manmohansingh flagged off some reforms.

This group and forum purports to work as a resource site for liberals.


This Group

Conveners and editors: Manvendra Kachole, Shrikant Umrikar, Shyam Ashtekar, Sumant joshi, Dinesh Sharma

Advisors: Sunil Bhandare, Barun Mitra, Nilu damle, Vasundhara Kashikar, Nishikant Bhalerav, Chadrahas Deshpande, Rajiv sane, Pradeep Pendse, Sureshchnadra Mhatre

Subject editors
Economy and finance: Sanjay Panse
Agriculture: Govind Joshi, Ajit Narde
Law, land laws: Anant Umrikar, Dinesh Sharma, Subhash Khndagale
Biotechnology: Manvendra Kachole
Sugarcane and Sugar Industry: Ajit Narde
Education: Manvendra Kachole, Heramb Kulkarni
Health: Shyam Ashtekar
Agro-markets: Sanjay Panse, Girdhar Patil, Dinesh Sharma
Water: Pradeep Purandare
Literature: Shrikant Umrikar
Films & Documentaries: Raghunath Phadnis
Others: Lalit Bahale, Aditya Ashtekar

Close