Culture-History

Culture-History

Culture-History

धर्म-संस्कृती - सेक्युलॅरिझम

कम्युनिस्ट राज्यव्यवस्थेने धर्म-संस्कृती नष्ट करण्याचा प्रचंड प्रयत्न केला, त्यात त्यांना अपयश आहे. राज्य कोसळल्यावर चर्च व बौद्ध धर्म परत प्रस्थापित झाले.

लिबरल विचारसरणी धर्माधिष्ठीत नाही पण धर्माविरुद्ध देखील नाही. धर्म-संस्कृती या एकमेकात मिसळलेल्या व्यक्तिगत व सामाजिक समजूत व्यवस्था परंपरा आहेत. राज्यघटनेला बाधा येणार नाही अशा पद्धतीने धर्माचरण करण्यास लिबरल विचारसरणी अनुकूल आहे पण राज्यव्यवस्था त्यापासून अलिप्त असायला हवी. आता केवळ बहुधर्मीय समाज असल्यामुळे ही अलिप्तता आणलेली नसून आपली राज्यव्यवस्था व्यक्तीस्वातंत्र्य जोपासणारी असावी, शास्त्रीय व तर्कसंगत असावी या भूमिकेतून सेक्युलॅरिझम आवश्यक आहे. किंबहुना लिबरल राज्यघटना हाच एक नवा धर्म आहे असे मानायला हरकत नाही.

तथापि प्रत्येक व्यक्ती-कुटुंबाने आपला धर्म घरापुरता वा परस्प संबंधापुरता मर्यादित ठेवावा. राष्ट्र व्यवस्थेत संघर्ष वा पुढे तुकडे पडतील अशा धर्म-संघटना व्यवस्था रोखण्याचे काम राज्यव्यवस्थेलाच करावे लागणार आहे. थोडक्यात धर्माचा राजकीय व अस्मितादर्शक वापर करणे राष्ट्रव्यवस्थेला अनुकूल नाही.

धार्मिक अस्मितांच्या नावाखाली अलगता वाद, तिथल्या अल्पसंख्यांकांचे शिरकाण स्थलांतर या गोष्टी वेळीच रोखल्या पाहिजेत. हे काम शासनाबरोबर करायचे आहे; अर्थातच धर्मांतर ही वैयक्तिक बाब आहे. आपापल्या विचारश्रद्धेप्रमाणे धर्मांतर ही प्रक्रिया घटना पूर्णपणे कायदेशीर आहे, पण हिंसा, धाक, लालूच, राज्यव्यवस्थेचा वापर वगैरे मार्गे झालेले/होणारे धर्मांतर कायदेशीर कार्यवाहीसाठी पात्र आहे असे आम्ही मानतो.

अल्पसंख्यांकांचे यथायोगय संरक्षण करणे हे त्या त्या भागातल्या बहुसंख्यांकांचे कर्तव्य समजले पाहिजे, नाहीतर परत मध्ययुग अवतरायला वेळ लागणार नाही. यासाठी पूर्वीच्या किंवा भविष्यकालीन वर्चस्वाच्या कल्पना सर्वांनीच त्यागून नवे नागरिक घडवण्याचे काम शिल्लक आहे. यासाठी समान नागरी कायदा आवश्यक ठरतो. भाषा व प्रादेशिक संस्कृती अलग अलग असणे काहीसे अपरिहार्य व एका परीने चांगले आहे. पण त्यास अस्मिता वेगळे "राष्ट्र' मानणे ही गोष्ट वेगळी व अतिरेकी आहे. भारत हा संघराज्य आहे, पण युनायटेड नेशन्स नाही अशी काही मर्यादा घालणे भारताच्या अस्तित्वासाठीच आवश्यक आहे असे आम्ही मानतो.

Religion, caste and secularism

For most nations and communities religion and culture are intertwined, there is no denying that. So long as this does not create hatred and violence, the liberals are Ok with this. In India caste/ethnicity and language are additional realities to contend with. We have to allow the space for this but work towards a non-discriminatory society. This alone will make us a progressive nation. Liberal democracy works with mutual consent and negotiation which applies here too.

However we need not ignore all culture and heritage under the bulldozer as communists tend to do. Culture needs to be remodeled and evolved, rather than denied like communists and Islamists do.

The Hindu Philosophy and religion is basically pluralistic and can take any opinion from nihilist (Charvak) to believer. There is no grand theory in Hinduism. This is the best part of ancient Indian culture that can make a nation successful. Yet it is necessary that other Indian religions/sects need to accommodate this fact of life and smoothen their edges.

Beyond this basic mutual tolerance, all religions need to embrace scientific temper and rationale and rework their incongruent parts.

There should be no place for cheats and charlatans under the name of religion. State should not allow them secular space and any respectability.

The Indian constitution treats everyone as equal before law (but for some affirmative action for weaker sections). The liberal position is secular about religious matters, esp. when it comes to working of Government and institutions.In fact we need to work towards meritocracy rather than identity politics.

Reinterpretation of history is a complex game any political party will indulge in. There are no facts but interpretations, so goes one saying; and this applies more to history than the presence.


Download this

Bharat Liberals

Leave a Reply

Close