Environment

Environment

Environment

पर्यावरण व माणूस

युरोप अमेरिकेतल्या "ग्रीन' चळवळीमुळे पर्यावरणाची महती जगभर पसरली, त्याबद्दल काही रास्त जाणीवा आणि काळजी देशाच्या आणि जगाच्या विषयपत्रिकेवर आल्या हे स्वागतार्ह आहे. ग्लोबल वॉर्मिंग, हिमनद्यांचे क्षरण, कमी-जास्त होणारे पर्जन्यमान, दुष्काळ, वनराई लोकसंख्या-निसर्गाचा समतोल, नष्टप्राय होणारे पशुपक्षी, अणुवीज धरणे, नद्यांचे प्रदूषण आणि शोषण, पाळीव प्राण्यांची संख्या, प्राणी हक्क, खाणी व उत्खलन, आदिम जातींच्या योगक्षेम पश्चिमघाट, जनुक बदल पिके आदि अनेक मुद्दे ऐरणीवर असतात. विकास की विनाश असा प्रश्न मांडला जातो.

मनुष्यकेंद्री विचारपद्धत हे लिबरल विचारसरणीचे मुख्य सूत्र आहे. वरील सर्व पर्यावरणीय विषयांची मांडणी मनुष्यकेंद्री असेल तर तिच्यावर विचार करता येतो. पण जेव्हा पर्यावरण हेच केंद्र धरून प्रगती-विकासाच्या मार्गात खीळ घातली जाते असे दिसते त्यावेळी लिबरल विचारसरणी त्यात सहमत असू शकत नाही.

एकतर एकूण पृथ्वी व पर्यावरणाचे संपूर्ण बरे-वाईट मानव घेऊ शकत नाही, कारण त्या आधीही पृथ्वी-पर्यावरणाचे बरेवाईट घडलेले आहे. या प्रक्रिया बऱ्याच प्रमाणात आहेत, काही पृथ्वीच्या भौतिक घटकांशी निगडित आहेत (उदा. अलनिनो) माणूस त्याच्या आर्थिक व्यवहारातून त्यावर किरकोळ प्रभाव टाकू शकतो, तो प्रतिकूल होऊ नये यासाठी जागृती व उपाय करणे जेवढे शक्य आहे ते मानवाने केले पाहिजे यात शंका नाही.

यातले बरेच "पर्यावरणीय' मुद्दे एकांगीपणे आणि अतिशयोक्त असतात. उदा. अणुवीज नको असा मुद्दा धरला तर वाढत्या लोकसंख्येला वीजपुरवठा कसा करणार याचे उत्तर द्यावे लागेल. शाश्वत पर्यावरण हा एक भ्रम आहे.

यापेक्षा अगदी तद्दन फालतू मुद्देही हरघडीला उपस्थित केले जातात. उदा. रस्त्यातली झाडे तोडायला कोर्टाकडून आणलेली बंदी. या झाडांना धडकून अनेक अपघात व मृत्यू घडतात, घडले आहेत. मेनका गांधी यांचे श्र्वानप्रेम इतके टोकाला गेले की रस्तोरस्ती कुत्र्यांच्या झुंडी तयार झाल्या आणि पालिकांना त्यावर काहीही करणे अशक्यप्राय झाले आहे. गोवधबंदी, गोवंशहत्याबंदी ही अशीच एक अनर्थकारी अजागळ कल्पना आहे.

युपीएच्या काळात ओरिसातल्या महत्त्वाकांक्षी खाणप्रकल्पाला मूठभर आदिवासी पाड्यांच्या निमित्ताने कायमची खीळ घातली गेली; त्यांना पर्यायी जमीन-जंगल-वसाहत देणे सहज शक्य होते. पर्यावरणी मंडळीने प्रेम जंगलाचे-वनाचे-झाडांचे आहे की आदिवासी समूहांचे याचीही स्पष्टता येऊ शकत नाही. शेवटी आर्थिक व जागतिक परिप्रेक्ष्यात या गोष्टींचा विचार करावा लागतो. नदीच्या काठी राहणारा नदीवर पूर्ण मालकी सांगू शकत नाही, कारण त्याच न्यायाने उगमाकडचा माणूस नदीबद्दल काहीही करू शकेल. खाजगी मालमत्ता व सार्वजनिक स्त्रोत यांचे समतोल भान ठेवायला लागेल.

पण शेवटी या सर्व गोष्टींचा निर्णय मनुष्यकेंद्री व अनर्थिक न्यायाच्या दृष्टिकोनातून करावा लागेल. परदेशी फंड घेऊन इथल्या प्रकल्पांना विरोध करणे, यातली दिवाळखोरी उघडकीला यायला हवी. चांगले पर्यावरण सर्वांना हवे आहे, त्याची काही किंमत मोजायला लागेल पण विकासही हवा आहे, त्याचीही किंमत द्यावी लागते. या पर्यावरण प्रेमी संस्था इथल्या अनर्थिक मदतीवर चालतील त्यावेळी निदान किमान विश्र्वासार्ह वातावरण तयार होईल. अन्यथा पर्यावरण चळवळ एक आंतरराष्ट्रीय दबावगट/कट मानणे चुकीचे होणार नाही.

Environment

Man is the center of earth, so goes the liberal principle. Liberalism requires a human centric position. Environment is for man and to that extent environmentalism is in place for liberals. Lately environmentalism is coming in form of various movements to block this or that development. (We are witness to a movement stalling of felling trees in the midst of road-widening. For three years 2000 trees stayed in the midst of roads, claiming many vehicles, lives and funds). Environmentalism can thus take weird and wild forms. The litmus test is the health and wealth of the community and stakeholders. Often these situations are classical dilemmas and need to be resolved with tradeoffs, give and takes. There can be genuine activists concerned with deforestation, degradation, tribal rights, river-waters, flora and fauna. But question to ask is, is the activist group getting foreign and rival industry funds to stall programs and projects? The local and national economy makes our survival possible. That has to be protected as the principle interest. Affected groups should be compensated and rehabilitated with democratic respect and negotiation. Situations can have winners and losers, and the latter need to be protected from losses. But there is a larger national good to attend. This is true esp. for projects regarding water, power, roads, ports, industry etc.

Democracy is about balancing interests of diverse groups in the best possible manner, with an eye on the larger good.


View in Marathi Language

Bharat Liberals

Leave a Reply

Close